आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदेडमध्ये पोलिसालाच मारहाण:देगलूर तालुक्यातील घटना, 3 जणांविरोधात गुन्हा, पोलिस स्टेशनसमोरच झाला वाद

13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोलिस ठाण्यात कामानिमित्त आलेल्या एका महिलेसह दोघांनी चक्क पोलिसालाच मारहाण करून गोंधळ घातल्याची घटना देगलूर तालुक्यात घडली आहे. हा प्रकार १२ मे रोजी दुपारी एकच्या सुमारास मरखेल पोलीस ठाण्यासमोर घडला.

मरखेल ठाण्यात एका कामानिमित्त राहुल भिमराव राठोड (१९), भीमराव बंडू राठोड (५५) आणि सुमनबाई भीमराव राठोड (५०) (राहणार आंदेगाव तांडा, तालुका मुखेड) हे गेले होते. दुपारी एकच्या सुमारास या तिघांमध्ये आणि पोलीस कर्मचारी विष्णुकांत चामलवाड यांच्यात वाद झाला. हा वाद अचानक टोकाला गेला आणि पोलीस ठाण्यासमोर असतानाच या तिघांनी पोलीस विष्णुकांत चामलवाड यांना शिवीगाळ करत थापड- बुक्यांनी मारहाण केली.

हा गोंधळ सुरू असल्याने ठाण्यात उपस्थित असलेल्या काही कर्मचाऱ्यांनी धाव घेत हा वाद मिटविला आणि तिघांनाही ताब्यात घेतले. याप्रकरणी विष्णुकांत चामलवाड यांच्या फिर्यादीवरू शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी मरखेल पोलीस ठाण्यात वरील तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव मद्दे करत आहेत. पोलीस ठाण्यात पोलिसांना मारहाण झाल्याच्या या प्रकाराने सारेच हैराण झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...