आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खडे बोल:‘प्राण जाए पर वचन न जाए’ हेच आमचे हिंदुत्व : आदित्य ठाकरे,  हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून सतत टीका करणाऱ्या भाजपसह विरोधकांवर पर्यावरणमंत्र्यांची टीका

नांदेड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

धर्म म्हणजे काय? हिंदुत्व म्हणजे काय? हे हल्ली लोकांकडून शिकवले जात आहे. पण आम्हाला याची गरज नाही. आमचा एकच धर्म आहे तो म्हणजे सेवाधर्म. ‘रघुकुलरित सदा चली आऐ, प्राण जाए पर वचन न जाए’ हेच आमचे हिंदुत्व आहे, असे सांगत राज्याचे पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी भाजपसह विरोधकांवर टीका केली.

नांदेडजवळ वाडी (बु.) येथे उभारण्यात येणाऱ्या शंभर खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे भूमिपूजन मंत्री ठाकरे यांच्या हस्ते मंगळवारी झाले त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आरोग्यमंत्री राजेश टोपे, खासदार हेमंत पाटील, खासदार संजय जाधव, आमदार बालाजी कल्याणकर, माजी मंत्री कमलकिशोर कदम आदींची उपस्थिती होती.

उपजिल्हा रुग्णालयाला प्रबोधनकारांचे नाव देण्याची मागणी
प्रबोधनकारांचे नाव उपजिल्हा रुग्णालयालयाला द्यावे यासाठी आपण आरोग्यमंत्री, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असून आम्ही राजकीय नव्हे, तर विकासकामांचा भोंगा लावतो, अशी टीका मंत्री उदय सामंत यांनी मनसेवर केली. खासदार हेमंत पाटील, संजय जाधव, बालाजी कल्याणकर हे पक्षाची खरी संपत्ती असल्याचे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...