आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मूकमोर्चा:नांदेडमध्ये मूकमोर्चा काढत हत्येचा निषेध; हल्लेखोरांच्या अटकेची मागणी, व्यावसायिक संजय बियाणी यांची गोळी झाडून केली हत्या

नांदेड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

धकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची गोळी झाडून मंगळवारी गोळी झाडून हत्या झाली होती. याचे पडसाद बुधवारी नांदेडसह बीड, हिंगोली जिल्ह्यात पाहायला मिळाले. नांदेडमध्ये व्यापाऱ्यांनी बंद पुकारला होता. व्यापाऱ्यांनी जुना मोंढा येथून मूकमोर्चा काढला. यात महिला व्यापाऱ्यांचाही सहभाग होता. खून प्रकरणातील व्यक्तींना तत्काळ अटक करावी, असे निवेदन पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांना दिले. तसेच राजस्थानी विप्र समाजाच्या वतीनेही निवेदन देण्यात आले.

दरम्यान, संजय बियाणी यांच्या पार्थिवावर बुधवारी (६ एप्रिल) दुपारी गोवर्धनघाट स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर अंत्ययात्रा येताच कोलंबीच्या गावकऱ्यांनी पोलिस यंत्रणेच्या विरोधात घोषणाबाजी करून अंत्ययात्रा थांबवली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

‘धमकीचे फाेन येणाऱ्यांनी न घाबरता समाेर यावे’
खंडणीसाठी धमक्या येत असल्यास पाेलिस अधीक्षक किंवा माझ्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मंत्री अशोकराव चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केले. हत्येच्या तपासासाठी एसआयटी स्थापन केल्याचे ते म्हणाले. रेकॉर्डवरील ४५ गुन्हेगारांची चौकशी झाल्याचे पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...