आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:483 आकडेबहाद्दरांवर केली दंडात्मक कारवाई , नांदेड परिमंडळाची वीज चाेरांविरुद्ध धडक माेहीम

नांदेड23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अति वीज हानी असलेल्या वीज वाहिन्यांवरील वीज चोरीविरोधात राबवलेल्या महामोहिमेत नांदेड शहर विभागाने तब्बल ४८३ वीज चोऱ्या पकडल्या. यामुळे महावितरणचे दहा लाखांच्या वर नुकसान झाल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. या वीज चोरांवर वीज कायदा २००३ नुसार दंडात्मक कारवाई सुरू आहे.

नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर, अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. दोन दिवसांत राबवलेल्या धडक कारवाईत चौफाळा वाहिनीवरील १२३ आकडे, विवेकनगर वाहिनीवरील परिसरात १४१, बिलालनगर वाहिनीवरील भागात ११२, देगलूर नाका वाहिनीवरील लक्ष्मीनगर भागात ३५, रेल्वे ट्रॅक वाहिनीवरील इस्लामपुरा भागात २२, चौक युनिटअंतर्गत सिराज गल्लीत १०, चौफाळा युनिट कार्यालयांतर्गत मॅफको वाहिनीवरील ४०, टाकून वीज वापरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.

हलगर्जीपणा करणारे कर्मचारीही रडारवर ^वीज हानी कमी करण्याच्या दृष्टीने वीज चोरीविरोधात धडक मोहीम सातत्याने यापुढेही राबवली जाणार आहे. या कारवाईत हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यावरही कंपनीच्या नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल. - दत्तात्रय पडळकर, मुख्य अभियंता, नांदेड परिमंडळ.

बातम्या आणखी आहेत...