आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानांदेडमधील देगलूर तालुक्यातील वन्नाळी येथील गुरुद्वारापासून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेला सुरुवात झाली आहे.
बिलोली तालुक्यातील शंकरनगरकडे पदयात्रा रवाना झाली आहे. आज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत राहुल गांधी नांदेडमध्ये पदयात्रा करणार आहेत. राज्यातील नांदेड, हिंगोली ,वाशीम, अकोला आणि बुलढाणा अशा 5 जिल्ह्यांतून 14 दिवस हि यात्रा तब्बल 384 किलोमीटरचा प्रवास करणार आहे.
आमच्या यात्रेचे लक्ष्य
राहुल गांधी यांनी देगलूर वन्नाळी येथील बाबा जोरावर सिंग बाबा फतेह सिंगजी यांच्या गुरुद्वाराला भेट दिली. यावेळी राहुल गांधी यांनी गुरुपूरनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. राहुल गांध म्हणाले, गुरुनानक देवजी यांच्या आशीर्वादाने परस्पर सौहार्द आणि समानता निर्माण करणे हेच आमच्या यात्रेचे लक्ष्य आहे.
आदित्य ठाकरे सहभागी होणार
भारत जोडो यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून जयंत पाटील, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार 10 नोव्हेंबर रोजी सहभागी होणार असल्याचे समजते. मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार की नाही याबद्दल साशंकता आहे. विशेष म्हणजे शिवसेनेकडून आदित्य ठाकरे या यात्रेत सहभागी होणार असल्याची माहिती सचिन अहीर यांनी दिली. मात्र, सभा आणि इतर कार्यक्रमांमुळे उद्धव ठाकरे या यात्रेत सहभागी होण्याची शक्यता कमी आहे.
आजच्या पदयात्रेत काँग्रेस नेते नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, कन्हैया कुमारसह सर्व प्रमुख काँग्रेस नेते सहभागी झाले आहेत.
नांदेडमध्ये वाहतूक वळवली
यात्रेमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असून ढोल-ताशांच्या गजरात हजारो कार्यकर्ते पदयात्रेत सहभागी झाले आहेत. आज देगलूरहून ही यात्रा निघाल्यानंतर देगलूर ते नांदेड हा मार्ग 7 ते 12 नोव्हेंबरपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. या मार्गावरील वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आली आहे. नांदेड मधील जवळपास 9 मार्गावरील वाहतूकही वळवण्यात आली आहे. यात्रा सुरळीत व्हावी यासाठी 300 अधिकारी, दीड हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
राहुल गांधी यांची आजची यात्रा
हाती मशाल घेऊन राहुल गांधी महाराष्ट्रात
कन्याकुमारीपासून सुरू झालेली खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सोमवारी (7 नोव्हेंबर) नांदेड जिल्ह्यातील देगलूरमध्ये दाखल झाली. हाती मशाल घेऊन लाखोंच्या संख्येने लोक या वेळी राहुल गांधी यांच्यासोबत होते. देगलूर येथील नगर परिषदेशेजारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात यात्रेचे आगमन होताच बंजारा, आदिवासी नृत्य व पोवाडा या महाराष्ट्रातील लोकनृत्याने राहुल गांधी यांचे स्वागत करण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.