आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल गांधी यांनी दिला लॅपटॉप:सर्वेश होऊ शकेल सॉफ्टवेअर इंजिनिअर

नांदेड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सॉफ्टवेअर इंजिनिअर बनायचे स्वप्न बाळगणाऱ्या नांदेडच्या सर्वेश हाटणेला शाळेत गरिबीमुळे कॉम्प्युटरही पाहता आला नव्हता. कॉम्प्युटर पाहता न आल्याने सॉफ्टवेअर इंजिनिअर बनण्याचे स्वप्न कसे पूर्ण होणार, असा प्रश्न त्याला पडला होता. भारत जोडो पदयात्रेसाठी नांदेडला आलेल्या राहुल गांधी यांना हे कळताच त्यांनी शुक्रवारी त्याला लॅपटॉप भेट दिला. या वेळी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणही उपस्थित होते. लॅपटॉप मिळाल्याने सर्वेश आता सॉफ्टवेअर इंजिनिअर होऊ शकेल, अशी चर्चा आहे.

बातम्या आणखी आहेत...