आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारत जोडो यात्रेत आज राहुल गांधी यांनी नांदेडमधील सर्वेश हाटणे या विद्यार्थ्याला लॅपटॉप भेट दिला. तेव्हा त्याच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. राहुल गांधींनी कालच्या सभेतही या मुलाचा उल्लेख केला होता.
राहुल गांधी यांनी आम्हाला लॅपटॉप दिला. त्याची खुशी झाली, असे उत्तर सर्वेश दिले. त्याचा हा व्हिडीओ काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरही पाहायला मिळतोय.
ध्येयाकडे वाटचाल...
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. नांदेड येथे त्यांची भेट सर्वेश हाटणे या विद्यार्थ्याशी झाली. तेव्हा राहुल यांनी सर्वेशला तुला मोठे झाल्यानंतर काय व्हायचे आहे, असे विचारले. तेव्हा त्याचे सॉफ्टवेअर इंजिनिअर हे बाणेदार उत्तर होते. या उत्तरानंतर राहुल यांनी तू कम्प्यूटर पाहिलंय का, असा प्रश्न विचारला. तेव्हा मात्र, त्याने खिन्न होत नाही असे उत्तर दिले. आज त्याच सर्वेशच्या स्वप्नात प्राण फुंकण्याचे काम राहुल गांधी यांनी केले.
स्वप्न होणार साकार
राहुल गांधी यांनी आज सर्वेशला सकाळीच बोलावून घेतले. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि इतर काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत या मुलाला लॅपटॉप भेट दिला. देशातील प्रत्येक मुलाचे स्वप्न साकार करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
अन् खुशी झाली
सर्वेश हाटणे याने लॅपटॉप मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. तो म्हणाला, पहाटे साडेचार वाजता उठलो. अंघोळ वगैरी केली. आमच्या गावातले सुनील टेम्पोवाले यांनी आम्हाला इथे आणले. त्याची आम्हाला खुशी वाटली. सॉफ्टवेअर इंजिनिअर व्हायचे आहे. त्यामुळे राहुल गांधींनी आम्हाला मर्ज कसे करायचे, यूट्यूब कसे चालवायचे हे समजावून सांगितले. लॅपटॉप दिला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.