आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकॉँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास हातात मशाल घेऊन महाराष्ट्रात आगमन झाले. देगलूर (जि. नांदेड) येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. या वेळी त्यांना औक्षणही करण्यात आले.
तेलंगणामधील मिर्झापूर येथून मशालीसह पदयात्रेला सुरुवात झाली. मशाल हाती घेऊन हजारो कार्यकर्ते सहभागी होते. फटाक्यांच्या अातषबाजीत महाराष्ट्राच्या सीमेवर राहुल यांचे स्वागत झाले. आठ वाजून ५० मिनिटांनी सुरू झालेली मशाल पदयात्रा चाळीस मिनिटांनी देगलूरमध्ये पोहोचली. त्यानंतर वन्नाळी येथे गुरुद्वारा यादगार साहिबजादे बाबा जोरावरसिंघजी बाबा फतेहसिंघजी दर्शन घेऊन राहुल यांनी अरदास केली.
कन्याकुमारीपासून सुरू झालेली खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सोमवारी (७ नाेव्हेंबर) नांदेड जिल्ह्यातील देगलूरमध्ये दाखल झाली. हाती मशाल घेऊन लाखोंच्या संख्येने लोक या वेळी राहुल गांधी यांच्यासोबत होते. देगलूर येथील नगर परिषदेशेजारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात यात्रेचे आगमन होताच बंजारा, आदिवासी नृत्य व पोवाडा या महाराष्ट्रातील लोकनृत्याने राहुल गांधी यांचे स्वागत करण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.