आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जोरदार पाऊस:जालन्यात पाऊस, नांदेडमध्ये चार मंडळांत अतिवृष्टी

नांदेड/जालना7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात बुधवारी रात्री तसेच गुरुवारी पहाटे झालेल्या जोरदार पावसामुळे नांदेड तालुक्यातील चार मंडळांत अतिवृृष्टीची नोंद झाली. उमरी, लोहा, अर्धापूर, मुदखेड, कंधारमध्ये जोरदार पाऊस झाल्यामुळे नदी-नाल्यांना पूर आला होता. सततच्या पावसामुळे खरिपातील पिकांच्या नुकसानीचे प्रमाण वाढत आहे. बुधवारी दुपारनंतर व गुरुवारी पहाटे नांदेड, उमरी, लोहा, अर्धापूर, मुदखेड, कंधार तालुक्यामध्ये जोरदार पाऊस झाला. दरम्यान, जालना जिल्ह्यात २४ तासांत सरासरी १७.५० मिमी पावसाची नोंद झाली. जालना शहरातही पावसाने चांगलेच झोडपून काढले.

बातम्या आणखी आहेत...