आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवक महोत्सव:‘स्वारातीम’चा ‘राष्ट्रचेतना’ युवक महोत्सव नांदेडमध्ये

नांदेड25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सव नांदेड येथील ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॅम्पस, विष्णुपुरी येथे ७ ते १० ऑक्टोबरदरम्यान होणार आहे. कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत आजादी का अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘राष्ट्रचेतना २०२२’ असे समर्पक नाव देण्यात आले आहे.

महाविद्यालयांनी आपल्या प्रवेशिका १९ सप्टेंबरपर्यंत विद्यार्थी विकास विभागात सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यात एकूण २८ कला प्रकारांचे सादरीकरण होणार आहे. नांदेड, परभणी, लातूर आणि हिंगोली जिल्ह्यांच्या महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी, कलावंत यात सहभागी होणार आहेत.

युवक महोत्सवातील विषय : युवक महोत्सवासाठी शोभायात्रेचा विषय ‘लढा स्वातंत्र्याचा... गाथा बलिदानाची’ हा ठेवण्यात आला आहे. वक्तृत्व स्पर्धेसाठी स्वातंत्र्याची ७५ वर्षे : काय कमावले? काय गमावले?, संस्काराविना शिक्षण विनाशाचे लक्षण, कैफियत शेतकऱ्यांची हे तीन विषय ठेवण्यात आलेले आहेत.

बातम्या आणखी आहेत...