आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मदतीची अपेक्षा:ठाेस मदत की पुन्हा आश्वासन, शेतकरी आत्महत्या थांबेनात; मंत्री सत्तार आज नांदेडमध्ये

नांदेड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र अशी घोषणा केली होती. पण गेल्या दीड महिन्यात राज्यात १३७ आत्महत्या झाल्या आहेत. मराठवाड्यात तर आत्महत्यांचे हे सत्र अजूनही थांबलेले नाही. मुख्यमंत्री काही दिवसांपूर्वी येऊन गेले. पण नांदेडमधील शेतकऱ्यांना मदत काही मिळाली नाही. कृषिमंत्री झाल्यानंतर अब्दुल सत्तार पहिल्यांदा मराठवाडा दौऱ्यावर निघाले आहेत. त्यांच्याकडून तरी ठाेस अन् तातडीच्या मदतीची घाेषणा हाेईल, अशी आशा बळीराजा लावून बसला आहे.

नांदेड जिल्ह्यात शेतात अजूनही पाणी साचलेले आहे. दुबार पेरणी करूनही पिके पाण्याखाली गेली. पिकांना जगवणे कठीण होऊन बसल्याने शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत. नांदेड जिल्ह्यात ३ लाख ५८ हजार ७३१ हेक्टरवरील पिके वाहून गेली आहेत. यात सहा लाख शेतकऱ्यांना फटका बसला आहे. सर्वाधिक नुकसान किनवट तालुक्यात झाले असून सुमारे ४९ हजार ३३२ हेक्टरवरील पिके भुईसपाट झाली आहेत. त्याखालोखाल हिमायतनगर तालुक्याचा नंबर लागत असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाली आहे. पिकांची म्हणावी तशी वाढ होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. या तालुक्यात प्रामुख्याने शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण सर्वाधिक वाढले आहे. यासंदर्भात “दिव्य मराठी’ने १७ ऑगस्टच्या अंकात ४५ दिवसांत राज्यातील १३७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा आढावा प्रकाशित केला. विराेधी पक्षनेते अजित पवार यांनीही विधिमंडळात याची दखल घेतली हाेती.

शेतकरी आत्महत्या थांबेनात; मंत्री सत्तार आज नांदेडमध्ये नांदेड जिल्ह्यात १९ दिवसांत ११ जणांनी मृत्यूला कवटाळले नांदेड जिल्ह्यात १ ते १९ ऑगस्टदरम्यान ११ शेतकऱ्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले. आठ दिवसांत किनवट तालुक्यातील कोस्मेट व याच तालुक्यातील जमुनानगर येथील दोन शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवली. परभणी जिल्ह्यातही स्वातंत्र्यदिनी पारवा येथील शेतकऱ्याने रेल्वेसमोर उडी मारून मृत्यूला कवटाळले होते. जालना जिल्ह्यातही २ ते ९ ऑगस्टदरम्यान तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या.

कर्जबाजारीपणामुळे पुन्हा एक आत्महत्या प्रतिनिधी | नांदेड नांदेड जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबत नसल्याचे चित्र आहे. कर्जबाजारीपणा आणि अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्याने किनवट तालुक्यातील जमुनानगर येथील शेतकरी जयसिंग मानसिंग आडे (६०) यांनी विष पिऊन आत्महत्या केली. ही घटना १८ ऑगस्ट रोजी घडली.

नांदेड जिल्ह्यात मागील दोन ते तीन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असली तरी अतिवृष्टीमुळे बहुतांश ठिकाणी शेतात साचलेल्या पाण्याचा उपसा अद्याप झालेला नाही. त्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. पिकांना जगवणे अवघड होऊन बसले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. मागील दीड महिन्यापासून शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत. या दीड महिन्यात आतापर्यंत २१ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे.

दरम्यान, शेतकरी जयसिंग यांच्या आत्महत्येप्रकरणी सुभाष उद्धव आडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, मांडवी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

पिकाची स्थिती पाहून निराश शेतात फवारणी करण्यासाठी गेले असता जयसिंग हे शेतातील कापसाची परिस्थिती बघून निराश झाले. एसबीआय बँकेचे कर्ज व इतर कर्ज असल्यामुळे कर्जाची परतफेड कशी करायची या विवंचनेत त्यांनी विष घेतले.

बातम्या आणखी आहेत...