आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदेड:पाऊस पडावा म्हणून 14 किमी दिंडी काढून रत्नेश्वरीदेवीला साकडे

नांदेड10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाऊस पडावा म्हणून अमरनाथ यात्रेकरूंनी धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली नांदेड ते रत्नेश्वरी अशाी १४ किमी अंतर पायी पाऊस दिंडी काढून रत्नेश्वरी मातेला साकडे घातले. या वेळी गडावर हजारो सीताफळ व जांभूळ बियांची लागवड करण्यात आली. बालाजी मंदिर हनुमान टेकडी येथे सोमवारी सकाळी ६ वाजता सतीश सुगनचंद शर्मा यांच्या हस्ते झेंडा दाखवून पाऊस दिंडीची सुरुवात झाली. जागोजागी भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. संतुकराव हंबर्डे, बालाजी मंदिराचे महंत कैलास महाराज वैष्णव, अखिल भारतीय क्षत्रिय राजपूत समाजाच्या महिला प्रदेशाध्यक्षा सुषमा नरसिंह ठाकूर, नांदेड भूषण माधवराव झरीकर आदींनी चहा-फराळ व जांभळांची, आंब्यांची व्यवस्था करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...