आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना महसूल सहायक एसीबीच्या जाळ्यात

नांदेड20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तक्रारदारावरील प्रतिबंधात्मक कार्यवाहीची नोटीस निकाली काढण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना नांदेड तहसील कार्यालयातील महसूल सहायकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे. ही कारवाई मंगळवारी (२६ जुलै) करण्यात आली.

तक्रारदारांनी २५ जुलै रोजी लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली होती. नांदेड तहसील कार्यालयात महसूल सहायक म्हणून कार्यरत असलेले संदीपकुमार लक्ष्मणराव नांदेडकर (४२) यांनी तक्रारदाराविरुद्ध निघालेली नोटीस निकाली काढण्यासाठी ५ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महसूल सहायक नांदेडकर याला तक्रारदाराकडून पाच हजार रुपये स्वीकारताना पकडले.

बातम्या आणखी आहेत...