आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातेलंगण राज्यात निवडणुका आल्या की तेथील मुख्यमंत्री महाराष्ट्राला फोडण्याचा प्रयत्न करतात. वेगवेगळी आमिषे दाखवत सीमावर्ती भागातील नागरिकांना आकर्षित केले जाते. आम्हाला तेलंगणात जायचे नाही पण आमचा विकास करा, अशी भूमिका सीमावर्ती भागातील सरपंच मंडळींनी व्यक्त केली.
धर्माबाद येथे तेलंगणच्या सीमावर्ती गावातील सरपंच मंडळींची मंगळवारी (६ डिसेंबर) शिंदे गटाचे सहसंपर्क प्रमुख आकाश रेड्डी यांनी बैठक बोलावली होती. यावेळी २२ गावातील सरपंच आणि उपसरपंचांनी सहभाग नोंदवला. या बैठकीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सतीश पाटील शिंदे, व्यंकट मुमोड, अनिल कमलाकर, दिगंबर जगदंबे, संतोष पाटील मोरे, गोरख नुत्तीवाड यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
सीमेवरील विकासकामांची स्थगिती मागे घ्या : चव्हाण सीमावर्ती भागातील गावांची नाराजी कमी करण्यासाठी किमान त्या भागात विकासकामांवरील स्थगिती सरकारने तातडीने मागे घ्यावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केली. गावांच्या शासकीय योजना व पायाभूत सुविधांबाबत तक्रारी असल्याचे ते म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.