आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भामट्याचा विक्रेत्याला गंडा:लाॅटरीचे आमिष दाखवून दीड लाखांचे दागिने लंपास; हिमायतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा

नांदेड18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लॉटरीवर स्कुटी आणि सोने लागल्याचे आमिष दाखवून विक्रेत्याचे दीड लांखाचे सोन्याचे दागिने भामट्यांनी लंपास केले. हि घटना हिमायतनगर शहरातील शंकरनगर भागात 5 मे रोजी घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, हिमायतनगर शहरातील शंकर नगर भागात मजुरदार विष्णू राजाराम उत्तरवार हे शहरासह ग्रामीण भागात उन्हातान्हात मुरमुरे विकून आपल्या कुटुंबाचा उदर निर्वाह चालवितात. सकाळी 12 वाजेपर्यंत व्यवसाय करून आल्यानंतर घरी बसले असता कोणीतरी अज्ञात व्यक्ती अंगावर काळ्या रंगाचा पैंटशर्ट घालून असलेला आला. आणि तुम्हाला लॉटरीवर स्कुटी आणि सोन्याचे बक्षीस लागले असल्याचे आमिष दाखविले. त्यासाठी तुम्हाला तुमच्याकडील सोने द्यावे लागेल असे म्हणून भुरळ पडून तुमच्याकडील सोने द्या सोनाराकडे वजन करून परत देतो अशी बतावणी केली.

दीड लाखांचे सोने केले लंपास
यावर विश्वास बसत नसल्याने उत्तरवार यांनी मी माझ्या मुलास विचारून तुमच्याकडे सोने व मोबाईल देतो असे म्हटल्यानंतर अज्ञात इसमाने तुम्ही चला मुलाला विचारू म्हणून सोबत सोने व मोबाईल घेण्यास सांगितले. आणि त्या अज्ञात व्यक्तीने त्याच्या स्प्लेंडर या दुचाकीवरून शहरातील रस्त्याने नेत असतानाच राज लाईट्स या दुकानाच्या बाजूला गाडी थांबवून गाडीवरून उतरविले. आणि त्यांच्या जवळ खिशात असलेला सोने-मोबाईल घेऊन सोनाराकडे जाऊन याची पावती आणतो म्हणून दिशाभूल करून 16.5 ग्रॅम वजन असलेले 89 हजाराचे गंठण आणि 10 ग्रॅम वजन असलेले 54 हजार किमतीचे एड व 13 हजार 999 रुपयाचा मोबाईल असा एकूण 1 लाख 56 हजार 999 रुपयाचा ऐवज घेऊन पळून गेला.

याबाबतची फिर्याद विष्णू राजाराम उत्तरवार यांनी दिल्यावरून हिमायतनगर पोलिसांनी अज्ञात आरोपीवर 420 म्हणजे फसवणूक करून दागिने लंपास केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक भगवान कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली बिट जमादार बालाजी सिंगणवाड हे करीत आहेत. दरम्यान आरोपी ज्या दिशेने दुचाकीवरून पळाला त्या भागाचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला असून, पोलिस त्या दिशेने तपास करीत आहेत. दिवसा ढवळ्या नागरिकांची अश्या प्रकारे फसवणूक करून एक प्रकारे सोन्याचे दागिने लंपास झाले आहेत.

घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली असून, पोलिसांनी या घटनेचा गांभीर्याने तपास लावून पुन्हा शहरात अश्या प्रकारच्या घटना घडणार नाहीत यासाठी कठोर पाऊले उचलावीत अशी मागणी नागरीकांडून केली जात आहे. याबाबत फिर्यादीकडून माहिती घेतली असता अज्ञात आरोपीने आमच्या घरी येऊन लॉटरी लागल्याचे सांगून बळजबरीने सोने आणि मोबाईल घेऊन पळ काढला असल्याचे सांगितले आहे. त्या दुचाकी स्वाराचा पाठलाग केला असता त्याने जोरात दुचाकी दामटून पळ काढला, याची माहिती मी मुल्ला दिली असता त्यांनी शहरातील मुख्य ठिकाणचे सीसीटीव्ही तपासून त्या चोरट्याचे छायाचित्र पोलिसांना देऊन तपास लावून न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...