आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक:विवाहाच्या सात दिवस‎ आधीच मुलीची आत्महत्या‎, सतत डोके दुखत असल्याने उचलले टोकाचे पाऊल

नांदेडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विवाहाच्या सात दिवसा‎ पूर्वीच नांदेड जिल्हयातील अंबाळा‎ (ता.हदगाव) येथील एका‎ उच्चशिक्षित तरूणीने गळफास‎ घेऊन आत्महत्या केली. ही घटना‎ शुक्रवारी घडली असून सतत डोके‎ दुखत असल्यामुळे त्रासला कंटाळून‎ तिने हे पाऊस उचलल्याचे समजते.‎

मयुरी बाळासाहेब पवार (२२) असे‎ मृताचे नाव आहे.‎ हदगाव तालुक्यातील अंबाळा या‎ गावी राहणारे बाळासाहेब दादाराव‎ पवार हे पेशाने शिक्षक असून ते‎ नांदेड येथे कार्यरत आहेत. त्यांची‎ मुलगी मयुरीने सतत डोके दुखत‎ असल्यामुळे त्रासला कंटाळून‎ शुक्रवारी (दि.५) सायंकाळी‎ घरातील छताच्या पंख्याला ओढणीने‎ गळा आवळून आत्महत्या करण्याचा‎ प्रयत्न केला. त्यात मृत्यू झाला.‎