आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालष्कर भरती संदर्भातील अग्निपथ योजनेचा विरोध करताना तेलंगणातील सिकंदराबादमध्ये हिंसक वळण लागले. त्यामुळे दक्षिण मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे. दक्षिण मध्य रेल्वे विभागातून धावणाऱ्या श्रीसाईनगर शिर्डी, अजिंठा एक्स्प्रेससह अनेक रेल्वे रद्द करण्यात आल्या. काही रेल्वे अंशत: रद्द, पुन्हा वळवल्या आहेत. तर देवगिरी एक्सप्रेस ५ तास ४० मिनिटे उशिराने धावली आहे.
आंदोलनामुळे दक्षिण मध्य विभागातील सिकंदराबाद-श्रीसाईनगर शिर्डी एक्स्प्रेस, सिकंदराबाद-मनमाड अजंठा एक्स्प्रेस, सिकंदराबाद-तिरुवअंनतपुरम रद्द करण्यात आली आहे. तसेच अनेक रेल्वे अंशत: रद्द, पुन्हा वळवल्या आहेत. तसेच सिंकदराबाद-मुंबई देवगिरी एक्स्प्रेस १७ रोजी तिची नियमित वेळ दुपारी १.२० वाजता सुटण्याऐवजी ३४० मिनिटे अर्थात ५ तास ४० मिनिटे उशिराने सुटले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.