आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चंचुप्रवेश:श्रीराम सागर धरणाचे पाणी जालना, बीडसाठी सोडण्यास तयार, बाभळी’साठी एकत्र बसून निर्णय हवा : केसीआर

नांदेड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तेलंगणतील श्रीराम सागर धरणातील पाणी जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यांना देण्याची तयारी असल्याचे सांगून नांदेड आणि तेलंगणच्या सीमेवर धर्माबाद तालुक्यातील बाभळी बंधाऱ्याच्या पाणी प्रश्नावरती महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश व छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा. तेलंगणमधील पाणी घेऊन महाराष्ट्रातील दुष्काळी भागात द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री तथा भारत राष्ट्र समिती (बीआरएस)चे संस्थापक अध्यक्ष के.चंद्रशेखर राव यांनी नांदेड येथे पत्रकार परिषदेत केले. महाराष्ट्रात पक्ष विस्तारासाठी नांदेड येथे बीआरएस पक्षाची रविवारी सभा झाली. त्यानंतर मुख्यमंत्री कसीआर यांनी पत्रकार परिषद घेतली.

महाराष्ट्रातील नेत्यांच्या संपर्कात
केसीआर म्हणाले, महाराष्ट्रातील नेत्यांसमोर माझ्या अनेक मंत्र्यांनी अनेक फेऱ्या मारल्या. पण यातून काही होत नाही. इतरही प्रकल्प महाराष्ट्र-तेलंगणशी जोडलेले आहेत. त्याबद्दल आम्ही नेहमी महाराष्ट्रातील नेत्यांच्या संपर्कात असतो. बाभळी बंधाऱ्यासाठी महाराष्ट्राच्या नेत्यांनी माझ्याकडे यायला हवे.

बातम्या आणखी आहेत...