आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावीज बिल थकीत असून ते भरण्यासाठी महावितरणकडून बाेलत असल्याचे सांगून भामट्याने एका सेवानिवृत्त अभियंत्याला ६ लाख रुपयांना गंडवण्यात आल्याची घटना घडली आहे.
सेवानिवृत्त अभियंता गौतम मारोती भावे यांना २७ मे रोजी मोबाइलवर कॉल आला होता. कॉलवरील व्यक्तीने तुमचे महावितरणचे ४५० रुपये बिल बाकी असल्याचे म्हटले. भावे यांनी तत्काळ होकार दर्शवला. योनो अॅपवर भावे यांना १०० रुपये भरण्याची सूचना करण्यात आली. त्यानुसार त्यांनी ते पैसे भरले. त्यानंतर त्यांना एक लिंक देण्यात आली आणि ती लिंक उघडण्यास सांगितले. सोबतच तुमचा मोबाइल चालू ठेवा, आम्ही तुमचे काम पूर्ण करून देतो असेही त्यांना सांगण्यात आले. या वेळेत भामट्याने त्यांच्या मोबाइलचा डाटा एक्सेस केला आणि त्यांच्या खात्यातून ६ लाख रुपये वळते करून घेतले. गौतम भावे यांना ९०६२३८८९३२ आणि दुसऱ्या एका मोबाइलवरून काॅल आला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.