आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भानामतीचा संशयावरून वृद्धाचा खून:नांदेड जिल्ह्यातील गागलेगाव येथील घटना, 3 आरोपींना पोलिस कोठडी

नांदेड17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भानामतीच्या संशयावरून एका वृद्धाचा खून करण्यात आल्याची घटना नांदेड जिल्हयातील गागलेगाव (ता. बिलोली) येथे एक मार्च रोजी घडली. हनमंत काशीराम पांचाळ (८५) असे मृताचे नाव आहे.रामतीर्थ पोलिसांनी तीनही आरोपींना अटक केली असून न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. गागलेगाव येथील हनमंत काशीराम पांचाळ (८५) यास ‘तू वामन डुमणे यांच्या मुलीवर भानामती केलास’, असे म्हणून वामन डुमणे, व रत्नदीप वामन डुमणे, (रा. गागलेगाव) दयानंद वाघमारे (रा. कागंठी) या तिघांनी संगणमत करून त्यांच्याच घरा समोर असलेल्या चिंचेच्या झाडाला पांचाळ यांना बांधून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. याठिकाणी त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मारोती नागनाथ पांचाळ यांच्या फिर्यादीवरून वामन डुमणे, रत्नदीप वामन डुमणे, आणि दयानंद वाघमारे या तिघांविरुद्ध रामतीर्थ पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला.

या घटनेचा तपास सहायक पोलिस निरीक्षक संकेत दिघे हे करत आहेत. ही घटना घडल्याचे समजताच धर्माबाद येथील उपविभागीय कार्यालयाचे पोलिस उपविभागीय अधिकारी विक्रांत गायकवाड यांनी रामतीर्थ पोलिस ठाण्यात भेट देऊन सदरील घटनेची सविस्तर माहिती घेतली. सदरील घटनेतील तीनही आरोपींना पोलिसांनी अटक केली. दरम्यान, शुक्रवारी रामतीर्थ पोलिसांनी तीनही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

बातम्या आणखी आहेत...