आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेट परीक्षा:‘स्वारातीम’ विद्यापीठाची ‘पेट’ परीक्षा 19, 20 जूनला होणार

नांदेड17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातर्फे पेट-२०२२ ही पीएचडीपूर्व प्रवेश परीक्षा तीन टप्प्यांमध्ये घेण्यात येत आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील परीक्षा २७ मे रोजी झाली. दुसरा टप्पा १९ जून रोजी तर तिसरा टप्पा २० जून रोजी घेण्यात येणार आहे, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके यांनी कळवले आहे.

१९ जून रोजी दोन सत्रांमध्ये परीक्षा घेण्यात येणार आहे. पहिले सत्र सकाळी ११ ते दुपारी १ असे दोन तासांचे असणार आहे. दुसरे सत्र दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत असेल. दरम्यान, पेट-२०२२ या पीएचडीपूर्व परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्र त्यांच्या नोंदणीकृत लॉगइन आयडीमध्ये उपलब्ध झालेले आहे. ते विद्यार्थ्यांनी डाऊनलोड करून घ्यावे, तसेच परीक्षा सुरू होण्याच्या ३० मिनिटे अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...