आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराखरेदी केलेल्या जमिनीच्या सातबारावर आपले नाव लावण्यासाठी तडजोडीनंतर ३ हजार ५०० रुपये लाच स्वीकारणाऱ्या नायगाव येथील तलाठ्यास लाच लूचपत प्रतिबंधक विभागाने गजाआड केले आहे. याबाबतची तक्रार एकाने ७ नोव्हेंबर रोजी दिली हाेती. त्यात खरेदी केलेल्या जमिनीवर असलेल्या इतर हक्कातील रकान्यातील नावे वगळून त्यांचे नाव सातबारा अभिलेखात लावण्यासाठी तलाठी बालाजी सीताराम राठोड ४ हजारांची लाच मागणी करत असल्याचे नमूद केले हाेते. याबाबत एसीबी पथकाने त्याच दिवशी पडताळणी करत ही कारवाई केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.