आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामध्य रेल्वेने ९ मार्च रोजी कळवल्यानुसार १० मार्चला पंढरपूर येथून सुटणारी पंढरपूर ते निझामाबाद (०१४१४) रेल्वे आणि ११ मार्चला निझामाबाद येथून सुटणारी निझामाबाद ते पंढरपूर (०१४१३) रेल्वेगाडी रद्द केली होती. आता या गाड्या पूर्ववत धावतील. १० मार्चला पंढरपूर येथून सुटलेली पंढरपूर ते निझामाबाद (०१४१४) रेल्वे पंढरपूर ते नांदेड अशी धावेल. नांदेड ते निझामाबाददरम्यान रद्द असेल. ११ मार्चला निझामाबाद येथून सुटणारी निझामाबाद ते पंढरपूर (०१४१३) रेल्वे निझामाबाद येथून न सुटता नांदेड येथून सुटेल.
सेलू-ढेंगळी पिंपळगाव-मानवत रोडदरम्यान केले जाणार काम
प्रतिनिधी | नांदेड सेलू-ढेंगळी पिंपळगाव-मानवत रोडदरम्यान रेल्वे पटरीचे काम करण्यासाठी शनिवारी (११ मार्च) पाच तासांचा लाइन ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे काही रेल्वेगाड्या उशिरा धावणार आहेत. मुंबई-नांदेड तपोवन एक्स्प्रेस (१७६१७) दोन तास १५ मिनिटे, नांदेड ते पुणे एक्स्प्रेस (१७६३०) ५० मिनिटे, काचीगुडा-रोटेगाव एक्स्प्रेस (१७६६१) तीन तास १० मिनिटे, नगरसोल-नरसापूर एक्स्प्रेस (१२७८८) एक तास ३० मिनिटे उशिरा धावेल. तसेच शनिवारी (११ मार्च) धर्माबाद येथून सकाळी ४ वाजता सुटणारी धर्माबाद-मनमाड मराठवाडा एक्स्प्रेस (१७६८८) धर्माबाद येथून एक तास मिनिटे उशिरा सुटेल. तर, करमाड-बदनापूर दरम्यान रेल्वे पटरीचे काम करण्यासाठी शनिवारी ३ तासांचा लाइन ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे काचीगुडा-रोटेगाव एक्स्प्रेस (१७६६१) एक तास दहा मिनिटे उशिरा धावेल. तसेच औरंगाबाद येथून दुपारी ४.१५ वाजता सुटणारी औरंगाबाद-हैदराबाद एक्स्प्रेस (१७६५०) दोन तास पाच मिनिटे उशिरा सुटेल, म्हणजेच औरंगाबाद येथून सायं. ६.२० वाजता सुटेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.