आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहराच्या यात्री निवास परिसरात एकाचा गोळ्या घालून खून केल्यानंतर पसार असलेल्या कुख्यात रिंदा संधू याचा सहकारी दलप्रीतसिंग ओमकारसिंग डहाण या पंजाबच्या दहशतवाद्याला दोन दिवसापूर्वी नांदेड दहशतवादी विरोधी पथकाने भटिंडा कारागृहातून ताब्यात घेतले. हस्तांतरण वॉरंटवरून त्याला नांदेडला आणण्यात आले. बुधवार (२७ जुलै) न्यायालयासमोर हजर केले असता न्यायाधीश आर. बी. राजा यांनी त्याला ३१ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत पाठवले. हा तपास १२ मे २०२२ रोजी नांदेड पोलिसांकडून एटीएसकडे वर्ग केला.
फेब्रुवारी २०१६ मध्ये बाफना टी-पॉइंट येथे कुख्यात रिंदा संधूचा भाऊ सत्विंदरसिंग उर्फ सत्ता चरणसिंग संधू याचा गोळ्या घालून खून करण्यात आला. ही माहिती समजताच भावाचा बदला घेण्यासाठी कुख्यात रिंदा हा आपल्या काही साथीदारांसह १९ ऑगस्ट २०१६ रोजी नांदेडला आला होता. त्यानंतर त्याला आपल्या भावाचा खून माळी बंधूंनी केल्याचा संशय होता आणि त्यानुसार रोशनसिंग माळी याचा भाऊ बच्चीतरसिंग माळी याचा एका शाळेत गोळ्या घालून खून केला होता. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी राेशनसिंगचा साथीदार असल्याचा संशय आल्याने रिंदाने अवतारसिंग उर्फ मन्नू गाडीवाले याचा गोळ्या घालून खून केला होता. या दाेन्ही वेळी रिंदासाेबत दलप्रीतसिंग असल्याचे तपासात समाेर आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.