आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदेड:गोदावरीत वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह सापडला

नांदेड20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोदावरी नदीपात्रात वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह मंगळवारी पहाटेच्या सुमारास सापडला. अंकुश आनंदराव पवार (२१) असे मृताचे नाव आहे. त्याच्यावर शोकाकुल वातावरणात आमदुरा (ता. मुदखेड) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

नांदेड जिल्ह्यातील आमदुरा येथील अंकुश आनंदराव पवार (२१) हा टेंटचा व्यवसाय करत होता. रविवारी तो गोदावरी नदीपात्रात चारच्या सुमारास वाहून गेला. त्याचा सर्वत्र शोध घेतला असता सापडला नाही. मुदखेड तहसीलदार, पोलिस निरीक्षक यासह गावातील अनेकांनी त्याचा शोध सुरू ठेवला. अखेर मंगळवारी पहाटेच्या सुमारास त्याचा मृतदेह आमदुरापासून काही अंतरावर तरंगताना आढळला. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. उत्तरीय तपासणी झाल्यानंतर त्याच्या पार्थिवावर आमदुरा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात तीन भाऊ, आईवडील असा परिवार आहे. मुदखेड पोलिस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...