आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:बसने दुचाकीस उडवले; भाऊ ठार, बहीण गंभीर जखमी

नांदेडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भरधाव एसटी बसने दुचाकीला उडवल्याची घटना मंगळवारी सकाळी मुखेड तालुक्यातील हिप्परगाजवळ घडली. यात दुचाकीवरील भाऊ जागीच ठार झाला तर सोबत असलेली बहीण गंभीर जखमी झाली. मुखेड आगाराची बस (एमएच १३ सीयू ७९०५ ) मुखेडहून शिंगणापूरला जाण्यासाठी निघाली होती.

हिप्परगाजवळ भाऊ व बहीण जात असलेल्या दुचाकीला (एमएच २० डीडी ८२२२) बसने जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील सुमीत शिवाजी तेलंग (१८, रा. दापकाराजा) हा ठार झाला. तर सोबत असलेली बहीण कोमल शिवाजी तेलंग (१६) ही गंभीर जखमी झाली. जळकोटच्या आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी मुखेड ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती निरीक्षक गोवाडे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...