आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी:किनवटला मंदिरातील दानपेटी फाेडून चोरी

नांदेड11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

किनवट तालुक्यातील भिसी येथे गावाजवळ असलेल्या सद्गुरू बाळूमामा मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी फोडली. ही घटना बुधवारी (२१ सप्टेंबर) रात्री घडली. दानपेटीतील चिल्लर व नोटा चोरून नेल्या.

चोरट्यांनी भिसी येथील दोन ते तीन घरांना बाहेरून कडी लावत एका घरात शिरण्याचा प्रयत्न करत असताना घरातील माणसे जागी झाली. त्यांनी आरडाओरड केल्याने चोरट्यांनी तेथून पळ काढला. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा सद्गुरू बाळूमामा मंदिराकडे वळवला. या ठिकाणी दानपेटी फोडून चिल्लर व नोटा चोरून नेल्या. दरम्यान, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी इस्लापूर, कोसमेट परिसराकडे लक्ष केंद्रित करून या चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांतून होत आहे. वाढत्या चाेऱ्यांमुळे वाडी, तांड्यांसह विविध गावांचे नागरिक त्रस्त झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...