आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातेलंगण आणि कर्नाटकच्या सीमेवर असलेल्या व देगलूरपासून ८ किमी अंतरावरील होट्टल येथील सिद्धेश्वर मंदिर हे चालुक्य शैलीतील एक कोरीव लेणे असलेले मंदिर आहे. येथे बहुप्रतीक्षेत हाेट्टल महाेत्सवाचे ९ ते ११ एप्रिलदरम्यान आयाेजन करण्यात आले आहे. यंदा महोत्सवात सदाबहार गाण्यांसोबत गण-गवळण, शास्त्रीय नृत्य, लावणीचा कार्यक्रम रंगणार आहे.
राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या शुभहस्ते या महोत्सवाचे ९ रोजी उद्घाटन होणार आहे.
तीन दिवसीय समारोहात पहिला दिवस प्रसिद्ध गायक मंगेश बोरगावकर यांच्या सदाबहार गाण्यांची मैफल होणार आहे. सायं. ५.३० वा. या महोत्सवाचा मुख्य उद्घाटन समारोह झाल्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमास सुरुवात होईल. रविवारी सायं. ५.३० ते ६ या वेळेत औरंगाबाद येथील खंडेराय प्रतिष्ठान गण-गवळण-गोंधळ हा लोककला प्रकार सादर करेल. गायन, वादन, नृत्य व लोकगीत याचे सुरेख मिश्रण या कार्यक्रमात असेल. ललित कला केंद्र पुणेच्या कुमारी श्रुती संतोष पोरवाल या कथ्थक नृत्य सादर करतील. यानंतर ऐनोद्दीन फखरोद्दीन वारसी व संच बासरीवादन करतील. सायं. ८ ते ९ या कालावधीत राजेश ठाकरे हे शास्त्रीय गायन, डॉ. भरत जैठवाणी हे शास्त्रीय नृत्य, तर विजय जोशी हे मराठी पाऊल पडते पुढे, मराठी लोकरंग हा कार्यक्रम सादर करतील.
सोमवारी औरंगाबाद तालुक्यातील पाटोदा येथील माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील हे लोकसहभागातून विकास याबाबत लोकप्रबोधन करतील. यानंतर स्थानिक लोकांच्या आग्रहास्तव खास लावणीचा कार्यक्रम ठेवण्यात आला असून सोनल भेदेकर, विद्याश्री येमचे, “अप्सरा आली’च्या अर्चना सावंत व संच हे लावणीचा कार्यक्रम सादर करतील.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.