आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात:जीप टिनशेडवर धडकली; एकाचा जागीच मृत्यू

नांदेड25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हदगाव तालुक्यातील तामसा येथील भाडे सोडून गावाकडे परत येणारी जीप थेट एका शिवारातील टिनशेडवर धडकली. यात एकाचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना खैरगाव (ता.हिमायतनगर) फाट्याजवळ मंगळवारी दुपारी घडली. नारायण फकीरराव कल्याणकर (२४) असे मृताचे नाव आहे.

सरसम (ता.हिमायतनगर) येथील जीप (एमएच २६ बीक्यू ७९९६) नेहमीप्रमाणे मंगळवारी भाडे घेऊन गेली होती. भाडे संबंधित गावाच्या ठिकाणी सोडून चालकासह अन्य एक जण आपल्या मूळ गावी परत येत होते. दरम्यान, खैरगाव शिवारात चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने वाहन थेट शेतातील टिनशेडवरील झोपड्यावर धडकले. या घटनेत झोपड्याच्या पत्रावरील दगड थेट गाडीत घुसून वाहनातील नारायण फकीरराव कल्याणकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे. दुपारी १२ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

बातम्या आणखी आहेत...