आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nanded
  • The Real Need Of Youth And Their Skills In The Development Of The Country, The Statement Of The Governor At The Convocation Ceremony Of Swaratim University.

नांदेड:देशाच्या विकासात युवक अन् त्यांच्या कौशल्याची खरी गरज, स्वारातीम विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यात राज्यपालांचे वक्तव्य

नांदेडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देशाची चांगली प्रगती होत असून हाच वारसा पुढे नेण्यासाठी चांगली पिढी घडवणे तेवढेच महत्त्वाचे आहे. देशाच्या विकासात युवकांची व त्यांच्या कौशल्याची गरज असल्याचे मत राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा २४ वा दीक्षांत समारंभ बुधवारी (१ जून) झाला. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून ऑनलाइन प्रणालीद्वारे ते व उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांची उपस्थिती होती. दीक्षांत मंचावर कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके आदींची उपस्थिती होती.

कोरोनाकाळातील कामाचे कौतुक
निसर्ग आणि मानव यांचा संघर्ष संपवून विश्व समृद्ध करण्याची जबाबदारी तरुणांनी स्वीकारावी, असे आवाहन ज्येष्ठ शास्त्रज्ञ तथा वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभागाचे माजी सचिव डॉ. शेखर सी. मांडे यांनी केले. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी विद्यापीठाने कोरोनाकाळात लॅबद्वारे केलेल्या कामाचे कौतुक केले. कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी विद्यापीठाने केलेल्या शैक्षणिक प्रगतीचा अहवाल सादर केला.

बातम्या आणखी आहेत...