आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा“मन्याडचा वाघ’, “मन्याड खोऱ्याची मुलूखमैदानी तोफ’ म्हणून ओळखले जाणारे डॉ. भाई केशवराव धोंडगे हे शेतकरी, मजूर, कामगारांच्या प्रश्नांवर शेवटच्या श्वासापर्यंत लढले, अशी भावना त्यांचे निकटवर्तीय माजी आमदार गुरुनाथ कुरुडे यांनी व्यक्त केली. केशवराव धोंडगे यांनी शेकापमध्ये आयुष्यभर कार्य केले. भाई धोंडगे यांनी १९६७ ते १०९५ पर्यंत कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले, तर १९७७ ते ८० या कालावधीत खासदार म्हणून नांदेड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी महाराष्ट्र लोकलेखा समितीचे पाच वर्षे चेअरमन म्हणून काम पाहिले. १९४९ मध्ये कंधार येथे श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटीची स्थापना करत ग्रामीण भागात गरिबांच्या मुलांसाठी ५७ शाळा, एक विधी महाविद्यालय, दोन महाविद्यालय स्थापन करून शिक्षणाची सोय केली. त्यांनी १९७५ साली आणीबाणीच्या काळात नाशिक जेलमध्ये १४ महिने कारावास भोगला.
संत गाडगे महाराज फिरले १९५३ मध्ये कंधार येथे संत गाडगे महाराज आले होते. त्यांनी बोर्डिंगला भेट दिली. संस्थेला मदतीसाठी ज्वारी जमा करण्यासाठी गाडगे महाराज यांनी दोन सेवेकरी दिले होते. या वेळी केशवराव त्यांच्यासोबत फिरल्याची आठवण गुरुनाथ कुरुडे यांनी सांगितली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.