आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:प्रशिक्षणार्थी डॉक्टरला लुटले; विद्यार्थ्यांनी केला रास्ता रोको

नांदेडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयात एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरला खंजिराचा धाक दाखवून त्याच्याकडून दहा हजार रुपये घेऊन लुटल्याची घटना शनिवारी घडली. दरम्यान, विद्यार्थ्यांनी अधीक्षकांच्या कार्यालयासमोर रास्ता रोको करून महाविद्यालय परिसर बंदिस्त करण्याची मागणी केली. या महिन्यातील ही तिसरी घटना असल्याचे विद्यार्थ्यांनी या वेळी सांगितले.

डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयात मागील काही दिवसांपासून विद्यार्थ्यांना शस्त्राचा धाक दाखवून लुटण्यात येत असल्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वैद्यकीय महाविद्यालयातील परिसर खुला आहे. पांगरी गावात जाणारा रस्ता परिसराच्या मध्यभागातून गेला आहे. त्यामुळे येथे शस्त्राचा धाक दाखवून लुटणे, मुलींची छेड काढणे असे उपद‌्व्याप येथे सर्रास सुरू असतात. महाविद्यालय परिसर बंदिस्त करण्यात यावा यासाठी पर्यायी मार्ग तयार करावा, अशी मागणी केली होती. परंतु, कोणतीही कारवाई झाली नाही. शनिवारी पुन्हा एकदा प्रशिक्षणार्थी डॉक्टरला खंजिराचा धाक दाखवून त्याच्याकडून दहा हजार काढून घेतले. त्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी अधीक्षकांच्या कार्यालयासमोर रास्ता रोको केला.

बातम्या आणखी आहेत...