आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विशेष रेल्वे:नांदेड-यशवंतपूर-नांदेड परळीमार्गे विशेष रेल्वेच्या होणार चार फेऱ्या

नांदेड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दक्षिण मध्य रेल्वेने प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन नांदेड-यशवंतपूर-नांदेडदरम्यान विशेष रेल्वेच्या चार फेऱ्या करण्याचे ठरवले आहे. नांदेड-यशवंतपूर (०७०९३) विशेष रेल्वे (सोमवार) नांदेड येथून ५, १२, १९ आणि २६ डिसेंबर रोजी दर सोमवारी दुपारी १.०५ वाजता सुटेल आणि पूर्णा, परभणी, गंगाखेड, परळी, उदगीर, भालकी, बिदर, रायचूर, गुंतकलमार्गे यशवंतपूर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता पोहोचेल. यशवंतपूर-नांदेड (०७०९४) विशेष रेल्वे यशवंतपूरहून निघून ६,१३,२० व २७ डिसेंबर रोजी दर मंगळवारी दु. ४.१५ वाजता सुटेल.

बातम्या आणखी आहेत...