आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानरसी-देगलूर राज्य महामार्गावर ट्रक व स्विफ्ट डिझायर कारची समोरासमोर जोराची धडक झाली. यात कारमधील एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. कारचालक व एक महिला गंभीर जखमी झाली. जखमींना नायगाव ग्रामीण रुग्णालयात प्रथमोचार करून नादेडला पाठवण्यात आले. ही घटना ३ मे रोजी रात्री ८:३० वाजता कुंचेली फाट्याजवळ घडली.
नरसी-देगलूर राज्य महामार्गावर कुंचेली फाटा किनाळा शिवारात देगलूरकडून (एपी ३ टीई ३१८६) या क्रमांकाचा नांदेडकडे जाणारा ट्रक व नरसीकडून शंकरनगरकडे जाणारी कार (एमएच २५ टी १०७५) यांच्यात समोरासमोर धडक झाली. यात शंकर गंगाराम जाधव (५५), महानंदा शंकर जाधव (५९ दोघे रा. टाकळी ता. नायगाव ), कल्पना कोंडीबा पाटील (३५ रा. केरूर ता. बिलोली) या तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर कारचालक धनराज शंकर जाधव व स्वाती हे गंभीर जखमी झाले. रामतीर्थ पोलिसांना माहिती कळताच सहायक पोलिस निरीक्षक विजय जाधव व त्यांच्या सहाकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली व अपघातग्रस्तांना मदत केली. अपघातात होताच ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.