आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nanded
  • Farmers Suicide Nanded | Marathwada Latest Update | Three People Ended Their Lives Due To Barrenness, Debt, Incident In Himayatnagar, Naigaon, Jalgaon Jamod Taluka

शेतकऱ्यांच्या आत्महत्या:नापिकी, कर्जाला कंटाळून तीन जणांनी संपविले जीवन, आकस्मिक मृत्यूची नोंद; नांदेड जिल्ह्यातील घटना

नांदेड13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नापिकी आणि कर्जबाजाराला कंटाळून मंगळवारी राज्यात विविध ठिकाणी तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली.नांदेड जिल्ह्यातील वायवाडी तांडा (ता. हिमायतनगर) येथील हरी रामधन आडे (६०) या अल्पभूधारक शेतकऱ्याने आत्महत्या केली.नायगाव तालुक्यातील शेतकऱ्याने विष घेऊन जीवन संपवले.जळगाव जामोद तालुक्यातील धानोरा महासिद्ध येथील अल्पभूधारक शेतकरी ओंकार सोनोने मंगळवारी सकाळी आत्महत्या केली. वायवाडी गावातील(ता.हिमातनगर) हरी आडे यांनी बँकेकडून दीड लाख व खासगीमध्ये अडीच लाखांचे कर्ज घेतले. मात्र, सततची नापिकी आणि अतिवृष्टीमुळे तणावात असलेल्या आडे यांनी मंगळवारी आत्महत्या केली.

तरुण शेतकऱ्याने घेतले विष

नायगाव तालुक्यातील कोकलेगाव येथील शेतकरी दत्ता पी. व्यंकट नारे (२३) यांनी शेतीच्या कर्जास कंटाळून २७ जुलै रोजी कामाजी नारे यांच्या शेतात विष घेऊन आत्महत्या केली. शिवानंद व्यंकट नारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, कुंटूर ठाण्‍यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

बातम्या आणखी आहेत...