आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोपींची झडती:तीन तलवारी, दोन गावठी पिस्तुले जप्त; फरार 5 आरोपींना अटक

नांदेड14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात कोम्बिंग ऑपरेशन राबवून पोलिसांनी दरोडा, जबरी चोरी, चोरी, घरफोडी, शस्त्र बाळगणारे ३५ अशा १०५ आरोपींची झडती घेतली. यात ३ तलवारी, २ गावठी पिस्तुले, १ खंजीर जप्त करण्यात आले. रेकॉर्डवरील फरारी ५ आरोपींना अटक करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी २१ नोव्हेंबरला पहाटे चार ते नऊपर्यंत कोम्बिंग ऑपरेशन राबवण्याबाबत आदेश दिले होते. त्यानुसार शहरातील सहा ठाण्यांच्या हद्दीत ऑपरेशन राबवण्यात आला. यात पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलिस अधीक्षक अविनाशकुमार स्वत: सहभागी झाले होते. कारवाईत दरोडा, जबरी चोरी, घरफोडी करणाऱ्या एकूण ७० आरोपींची व शस्त्र बाळगणारे ३५ असे एकूण १०५ जणांची झडती घेण्यात आली. यात रेकॉर्डवरील फरार असलेल्या एकूण ५ आरोपींना अटक झाली. तसेच अजामीनपात्र आरोपींची झडती घेऊन १३ आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...