आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायशवंतराव गडाख हे व्यक्तिमत्त्व वट वृक्षासारखे आहे. साध्या गोष्टीतील आनंद त्यांनी पुस्तकातून व्यक्त केला. राजकारणी असुनही निसर्गाबद्दल आस्था, प्रेम बाळगून त्यांनी जीवनातील उपकारक गोष्टी ‘मनातला पाऊस’ या पुस्तकातून उलगडून सांगितल्या. महाकाव्य, कादंबरी सारखे त्यांचे काम आहे, असे मत दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी व्यक्त केले. मुंबईतील नरिमन पाॅईट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमधील हाॅलमध्ये गुरुवारी सायंकाळी ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या ‘मनातला पाऊस’ या पुस्तकाचे प्रकाशन दिग्दर्शक मंजुळे,मंत्री छगन भुजबळ, मंत्री शंकरराव गडाख, ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर, कुलपती पी. डी. पाटील, पत्रकार अंबरीश मिश्र, उल्हासदादा पवार यांच्या हस्ते झाले. माजी खासदार यशवंतराव गडाख, खासदार विनायक राऊत, आेमराजे निंबाळकर, आमदार मंजुळा गावीत, आमदार दीपक केसरकर, आमदार महेंद्र थोरवे, आमदार शेखर निकम, आमदार शहाजीबापू पाटील, आमदार किशोर नाॅर्वेकर, विश्वास पाटील,श्रीकांत बोजेवार, शिवसेनेचे भाऊ कोेरेगावकर, उदयन गडाख आदी या कार्यक्रमास उपस्थित होेते. साहित्यिक अरुण शेवते यांनी या पुस्तकाची भूमिका स्पष्ट केली. या पुस्तकातून यशवंतरावांचे आयुष्य व प्रवास तसेच त्रासातुनही कसा आनंद मिळवला हे सांगितले. मंत्री छगन भुजबळ यांनी आजच्या राजकारण्यांमध्ये ‘मनातला पाऊस’ कठीण अाहे. राजकारणात असुनही सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी वावर ठेवत गडाख यांनी समाजमन जपलं. ते मधूर संबंधांमुळेच. या पुस्तकातून त्यांनी भावनांचे हिंदोळे लोकांसमोर मांडले आहेत. पत्रकार मिश्र यांनी ग्रामविकासातील सत्य या पुस्तकात मांडण्यात आल्याने ते कसे मोलाचे आहे हे सांगितले. तर उल्हास पवार यांनी यशवंतरावांनी अंर्तमनातलं दु:ख, कोलाहल व कल्लोळ पुस्तकातून मांडले आहे. राजकारणी बोलतात पण लिहित नाहीत, त्यास यशवंतराव कसे अपवाद आहेत हे सांगितले. राजकारण्यांच्या मनातल्या आठवणी टिपणे अवघड असते. पण संपादन करुन ते अरुण शेवतेंनी शक्य केल्याचे सांगितले. कुलपती पाटील यांनी हा मनातला पाऊस नव्हे, तर विचार असल्याचे सांगितले. शुन्यातुन चढउतार व निसर्ग सान्निध्यात राहून मिळवलेली नवी ऊर्जा प्रेरणादायक असल्याचे सांगितले. पत्रकार खांडेकर यांनी यशवंतराव चव्हाणांची सुसंकृतपणाची विचारधारा मनापासून पुढे नेणारे यशवंतराव गडाख हेच आहेत. आदर्श म्हणून बघाव असे ते आहेत. मनातला हा पाऊस प्रत्येकाच्या मनातला आहे. सुसंस्कृतपणातून जे जपलं तेच त्यांनी पुस्तकातून मांडलं आहे. सुत्रसंचालन डॉ. सुभाष देवढे यांनी, तर आभार शर्वरी शेवते यांनी मानले. ‘मनातला पाऊस’ या पुस्तकाचे प्रकाशन प्रसंगी दिग्दर्शक नागराज मंजुळे, यशवंतराव गडाख, मंत्री छगन भुजबळ, शंकरराव गडाख, राजीव खांडेकर, अरुण शेवते, पी. डी. पाटील, खासदार विनायक राऊत. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचे मत
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.