आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

4 एकर कोरडवाहू शेती:नापिकी व कर्जाला कंटाळून शेतकऱ्याने केली आत्महत्या

नांदेड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोहा तालुक्यातील गोविंद तांडा येथील अल्पभूधारक शेतकरी नागोराव तेजराव चव्हाण (३५) यांनी सततची नापिकी व कर्ज कसे फेडावे या चिंतेत गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना १ एप्रिल रोजी घडली. नागोराव यांची तांड्याच्या दक्षिणेस मारतळा-मुखेड रोडलगत ४ एकर कोरडवाहू शेती आहे. १ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता शेताकडे जाऊन येतो, असे सांगून ते शेताकडे गेले. त्यांनी सततच्या नापिकीला व कर्ज कसे फेडावे या चिंतेत शेतात असलेल्या लिंबाच्या झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांनी गेल्याच वर्षी मुलीचे लग्न केले होते. एक बहिण लग्नाची आहे. तिचे लग्न कसे करावे, बँकेचे कर्ज कसे फेडावे या चिंतेत ते होते. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीतील पिके पूर्णतः हातची गेली. त्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.