आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिमायतनगर ते घारापूर रस्त्यावरील नाल्यात खासगी बस व घारापूर फाट्यानजीक जड वाहतुकीचा ट्रक फसल्याने विदर्भ - मराठवाड्याची वाहतूक सोमवारी सकाळपासून ठप्प झाली होती.
अर्धापूर-फुलसांगवी या राष्ट्रीय महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे हिमायतनगर ते घारापूर रोडवर रोज वाहने फसत आहेत. घारापूरजवळील नाल्यात सोमवारी नेपाळमधून आलेल्या यात्रेकरूंची खासगी बस फसली असता घारापूर येथील गावकरी व लखन भीमराव शिंदे यांनी स्वतःच्या ट्रॅक्टरने रस्ता करून त्याची बस काढून दिली. अर्धापूर ते फुलसांगवी या राष्ट्रीय महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदाराची कामातील दिरंगाई आणि हलगर्जीपणामुळे अनेक पुलांची व काही ठिकाणी रस्त्यांची कामे अर्धवट ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे अल्पसा पाऊस होताच वाहने फसत असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे. घारापूर फाट्यानजीक जड वाहतुकीचा ट्रक फसल्याने विदर्भ - मराठवाड्याची वाहतूक सकाळपासून ठप्प झाली आहे. या प्रकारामुळे दळणवळणाचा प्रश्न निर्माण होत असून हा प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून संबंधित ठेकेदाराने तातडीने किमान एका बाजूने तरी रस्त्याचे व पुलाचे काम पूर्ण करून वाहतुकीची वारंवार होणारी कोंडी सोडवावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रामदास रामदिनवार, माधव शिंदे आदींसह घारापुरी, हिमायतनगर, बोरी, चाथरी, ब्राह्मणगाव, टेंभुर्णी, दिघी, विरसनी येथील नागरिकांनी केली आहे.
हिमायतनगर तालुक्यात घारापूरजवळील नाल्यात सोमवारी नेपाळमधून आलेल्या यात्रेकरूंची खासगी बस फसली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.