आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घटना:ट्रक-बसची समोरासमोर धडक; 12 प्रवासी जखमी, नांदेड-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील घटना

नांदेड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ३६१ वर गुरुवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास ट्रक व नांदेड-हदगाव एसटीची समोरासमोर धडक होऊन बसमधील १२ प्रवासी जखमी झाले. यापैकी चार जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना नांदेडच्या शासकीय व खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले.

नांदेड-नागपूर राष्ट्रीय महामार्ग ३६१ वर पार्डी म. गावाजवळ असलेल्या गुरुद्वारा जवळ नांदेडकडून हदगावकडे जाणारी एसटी (एमएच २० बीएल १७०७) व वारंगाकडून नांदेड जाणारा ट्रक (आरजे ४२ जी बी ७१०१) यांच्यात धडक झाली. नांदेड-नागपूर राष्ट्रीय महामार्गचे काम सुरू असून कामातील ढिसाळ नियोजनामुळे अपघात होत आहेत.

ट्रकचालक व बसचालक दोघेही गंभीर शेतामध्ये काम करणारे शेतकरी श्याम मरकुंदे, नारायणराव देशमुख यांनी अपघातस्थळी धाव घेतली. मात्र, बसचा चालक व एक प्रवासी महिला अडकून पडले होते. त्यांना काढण्यासाठी अर्धा तासाच्या वर अवधी लागला. अपघातात ट्रकचालक व बसचालक दोघेही गंभीर जखमी झाले. यात बस चालक रेशमाजी फुले (५५ रा. नांदेड) यांचा पाय फ्रॅक्चर झाला. गोदावरी पवार (६५), गंगाराम पवार (७२) (दोघे रा.शाहापूरवाडी), यशवंत लढे (४५, रा. मेंढला) विजय राजे (७०, रा. पुसद) सुभाष मस्के (६५) आदींसह बारा जण जखमी झाले.

बातम्या आणखी आहेत...