आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:कंधार, बिलोलीत दोघांची गळफास घेऊन आत्महत्या

नांदेड24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. मजुरी करणारे गोविंद गुंडू गायकवाड (३८) यांनी २१ जुलै रोजी दुपारी जंगमवाडी (ता.कंधार) येथील गोविंद परोडवाड यांच्या शेतामध्ये लिंबाच्या झाडाला गळफास घेतला. कंधार पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दुसरी घटना बामणी (ता. बिलोली) येथे घडली. शेतकरी गोविंद पिराजी भादेवाड (३०) यांनी २१ जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता अज्ञात कारणावरून स्वतःच्या घरी गळफास घेतला. चंद्रकांत हणमंतराव बादेवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, बिलोली पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली.

बातम्या आणखी आहेत...