आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:देवदर्शनासाठी जाताना ऑटो उलटून दोन ठार

नांदेड25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

किनवट तालुक्यातील बोधडी येथील भाविकांना तेलंगणातील देवीच्या दर्शनासाठी घेऊन जाणारा ऑटो उलटून झालेल्या अपघातात दोन जण ठार झाले. तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले. अन्य ६ जणांना किरकोळ इजा झाली. मंगळवारी (१ नोव्हेंबर) सकाळी १० वाजता झळकवाडी घाटात हा अपघात घडला.

किनवट तालुक्यातील बोधडी येथील भाविक १ नोव्हेंबर रोजी सकाळी बोधडीहून तेलंगणातील आडेलीदेवीच्या दर्शनासाठी निघाले. जलधरा ते झळकवाडी मार्गावरून ऑटो जात असताना झळकवाडी घाटाच्या उतारावर चालकाचा ताबा सुटला व उलटल्याने बालाजी पांडुरंग खोकले (१९) व नागेश रामा टारपे (२०) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. जखमींना पुढील उपचारासाठी किनवट येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. ऑटोचालक गणेश गवळेसह सहप्रवासी असलेले सुनील रामा टारपे, विशाल चंद्रकांत टारपे, विजय सुरेश टारपे, शंकर डुकरे, वसंत डुकरे, मारुती वोंवले हे किरकोळ जखमी झाल्याने त्यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.

बातम्या आणखी आहेत...