आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजय बियाणी हत्या प्रकरण:आणखी 2 आरोपींना अटक, 10 जूनपर्यंत पोलिस कोठडी; आरोपींची एकूण संख्या 9 वर

नांदेड25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्या प्रकरणात विशेष तपास यंत्रणेकडून शनिवारी आणखी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. यापूर्वी सात आरोपींना पोलिसांनी अटक केलेली असून या हत्या प्रकरणात आरोपींची एकूण संख्या ९ वर पोहोचली आहे. शनिवारी अटक करण्यात आलेल्या या दोन आरोपींना दहा जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची ५ एप्रिल रोजी सकाळी ११ च्या सुमारास त्यांच्या शारदानगर येथील निवासस्थानासमोर अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यानंतर या प्रकरणाचा विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास यंत्रणा विमानतळ, स्थानिक गुन्हे शाखा आणि विशेष तपास पथक करत होते. पोलिसांनी सात आरोपींना यापूर्वीच अटक केली आहे. हे सातही जण सध्या पोलिस कोठडीत आहेत.

या प्रकरणाचा पुढे कसून तपास करत मुदखेड येथील कृष्णा धोंडीबा पवार (२८) व नांदेडच्या मारवाड गल्ली भागातील हरीश मनोज बाहेती (२८) या दोघांना शनिवारी अटक केली. या दोघांनाही स्थानिक गुन्हे शाखा व विमानतळ पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दहा जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. याप्रकरणी आतापर्यंत ९ आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

बातम्या आणखी आहेत...