आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:राज्यात आणखी दोन कर्जबाजारी शेतकऱ्यांची आत्महत्या

नांदेड / गाेंदियाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कर्जबाजारीपणा आणि अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्याने नांदेड आणि गोंदिया जिल्ह्यात आणखी दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे.

जुलैत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत. मागील दीड महिन्यापासून शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबता थांबेना. आठवड्यातून दोन ते तीन शेतकरी आपली जीवनयात्रा संपवत आहेत. मुदखेड तालुक्यातील आणखी एका शेतकऱ्याने विष पिऊन आत्महत्या केली आहे. संतोष संभाजी उमाटे (२७) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. मुदखेड तालुक्यातील वासरी येथे, २९ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता संतोष उमाटे यांनी स्वतःच्या घरी अतिवृष्टीने शेत खरडून गेल्याने विष प्राशन केल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांना उपचारासाठी विष्णुपुरी येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. संजय दत्त उमाटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुदखेड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

गोंदियात गळफास शेतकऱ्याने घेतला गळफास अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध येथील शेतकरी, सोविंदा सुखराम राऊत (६१ ) या शेतकऱ्याने सकाळी स्वतःच्या शेतात गळफास लावून आत्महत्या केली. सोविंदा राऊत हा पत्नी, सून, मुलगा असे एकत्र राहत होता. व मोलमजुरी व शेतीचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. सोमवारी पहाटे तो पत्नीला शेताकडे जातो म्हणून सांगून गेला. त्यानंतर तो परतलाच नाही. घरच्यांनी शेतात जाऊन बघितले असता घटना उघडकीस आली.

बातम्या आणखी आहेत...