आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यू:लोहा आणि उमरी तालुक्यामध्ये विहिरीत बुडून दोन जणांचा झाला मृत्यू

नांदेडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील लोहा व उमरी तालुक्यात दोघांचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. हातनी शिवार संभाजी बन्ने यांच्या शेतातील विहिरीत फवारणीसाठी पाणी आणायला गेलेल्या महिलेचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. ही घटना २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजेनंतर लोहा तालुक्यातील हातनी श‍िवारात घडली. छाया संभाजी बन्ने (३९) असे मृत महिलेचे नाव आहे. दुसरी घटना उमरी तालुक्यातील धानोरा येथे घडली. शेतकरी गंगाधर शंकर गाडगे (३६) हे २९ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा ते ३१ ऑगस्टच्या सकाळी साडेआठ वाजेच्या दरम्यान शेताला जातो म्हणून निघाले असता गावालगत असलेल्या शेतातील विहिरीत ते पडले व मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...