आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समाजात तेढ:"जातिअंताशिवाय भारत जोडला जाणे अशक्य' ; अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचे मत

नांदेड21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात नेता हा समाज, धर्म, जातीवरून निर्माण होत आहे. समाजा-समाजात तेढ निर्माण करण्यासाठी राजकीय पक्ष पुढाकार घेत आहेत. त्यामुळे जातीयवाद वाढला आहे. येथील जातिव्यवस्था मोडीत काढल्याशिवाय भारत जोडला जाऊ शकत नाही. यासाठी देश एकसंघ ठेवण्यासाठी जाती जोडो अभियान राबवणे आवश्यक आहे, असे मत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.

नांदेड येथील मोंढा मैदान येथे शनिवारी धम्म मेळावा घेण्यात आला. या वेळी ते बोलत होते. धम्म मेळाव्यास अंजली आंबेडकर, रेखा ठाकूर आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले, समाजात व्यवस्थेमध्ये सुधारणा व्हायला पाहिजे. जोपर्यंत समाजात सुधारणा येणार नाही तोपर्यंत ज्या स्वातंत्र्यवीरांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देऊन एकता निर्माण केली ती एकता टिकवणे अवघड आहे. भारत जोडो यात्रा पाण्यावरचा बुडबुडा : राहुल गांधी हे भारत जोडो यात्रा काढत असल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतानाच आम्हीसुद्धा लाँग मार्च काढला होता, चालताना काय त्रास होतो याची जाणीव आम्हाला असून यातून विधायक काम काय हे दिसत नाही. त्यामुळे भारत जोडो यात्रा पाण्यावरचा बुडबुडा आहे, असे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...