आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदेड:तरुणाच्या मृतदेहाजवळ सापडले गावठी पिस्तूल; हत्या की आत्महत्या ?

नांदेड25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील स्वराज्यनगर भागात एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने ८ जून रोजी सकाळी एकच खळबळ उडाली. मृतदेहाजवळ गावठी पिस्तूल आढळले अाहे. त्यामुळे हत्या की आत्महत्या याचे गूढ कायम आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, अक्षय कोंडीराम भांडवले (२०,रा. बार्शी नाका, तेलगाव रोड, बीड) असे मृताचे नाव आहे. तो शहरातील एका ऑइल मिलमध्ये काम करायचा. ७ जून रोजी रात्री तो नित्याप्रमाणे घरी पोहोचला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी रात्री साडेआठ वाजता संपर्क साधला. या वेळी घरी यायला किती वेळ आहे, असे आईने विचारले असता, घराकडे येत आहे, असे त्याने सांगितले. मात्र, तो घरी पोहोचलाच नाही. रात्री ११ वाजेनंतर तो फोनही घेईना, त्यामुळे कुटुंबीयांनी मित्रपरिवार, ऑइल मिल व नातेवाइकांकडे चौकशी केली, पण त्याचा ठावठिकाणा लागला नाही. अखेर ८ जून रोजी सकाळी सात वाजता स्वराज्यनगरातील रिकाम्या भूखंडातील दाट झाडीत त्याचा मृतदेह आढळून आला. शिवाजीनगर ठाण्याचे पो. नि. केतन राठोड, सहायक निरीक्षक मनोजकुमार लोंढे, पो.ना.रवी आघाव, गणेश परजणे, विठ्ठल शिंदे, भगवान घोडके यांनी घटनास्थळी भेट दिली. पंचनामा करून मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठवला. दरम्यान, त्याच्या डोक्याला दोन्ही बाजूंनी छिद्र आहे. त्यामुळे खून की आत्महत्या, याचा तपास लावण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. घटनास्थळी अक्षय भांडवले याची दुचाकी आढळली.

बातम्या आणखी आहेत...