आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धर्माबाद तालुक्यातील 25 गावांचा तेलंगणात सामील होण्याचा इशारा,:सीमावादाचे लोण सांगली-सोलापुरातून आता मराठवाड्यात

नांदेड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद नव्याने तापलेला असताना आता हे लोण मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यापर्यंत आले आहे. सीमेवरील धर्माबाद तालुक्यात असलेल्या २५ गावांनी आता तेलंगणात सामील होण्याचा इशारा दिला आहे. या गावचे सरपंच आणि त्यांच्या समर्थकांची एक बैठक बासर येथे झाली.

या बैठकीत तेलंगण राज्यामध्ये सामील होण्याबाबत त्यांनी अनुकूलता दर्शवली आहे. मूलभूत सोयीसुविधा मिळत नसल्याने आपण हा निर्णय घेत असल्याचे या सरपंच व समर्थक गावकऱ्यांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितले.

... सारे काही गावांत मूलभूत सुविधा मिळवण्यासाठी
स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही सीमा भागातील गावांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याने जनतेचा हा आक्रोश असल्याचेही या बैठकीचे आयोजक शंकर पाटील होट्टे म्हणाले. वाढता भ्रष्टाचार, रस्त्याची दुरवस्था, पाण्याची टंचाई या सर्व गोष्टींपेक्षा तेलंगण सरकारच्या योजना प्रभावशाली आहेत आणि प्रांत रचना होण्याच्या अगोदर हा संपूर्ण परिसर निजामकालीन हैदराबाद राज्यात होता.

जत तालुक्यानंतर सोलापूर, आता नांदेड, सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात असलेल्या ४८ गावांनी पाणी प्रश्नावरून थेट कर्नाटकात सामील होण्याचा इशारा दिला होता. यानंतर सीमाभागातील गावांमध्ये अस्वस्थता असून अनेक गावांतून असे इशारे दिले जात आहेत.

तेलंगणात सामील होण्याची मागणी
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील गावे कर्नाटकात सामील होण्याचा इशारा देत आहेत. तर, नांदेड जिल्ह्यातील बिलोली, धर्माबाद, देगलूरकर आणि किनवट तालुक्यात सीमाभागात असलेली गावे तेलंगण राज्यात सामील होण्याची मागणी करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...