आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना विरुद्ध भाजप:शिवसेनेला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही, आदित्य ठाकरेंचा विरोधकांना टोला

नांदेड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेला धर्म किंवा हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही. आमचे हिंदुत्व रघुकुल रित सदा चली आयी, प्राण जाये पर वचन ना जाये असे असल्याचे म्हणत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही घटकपक्षांनी दिलेली वचन आम्ही पूर्ण करणार असा दावाही यावेळी आदित्य ठाकरेंनी केला आहे. ते आज नांदेडमध्ये पत्रकारांशी संवाद साधत होते.

गेली अनेक दिवस राज्यात हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून राजकारण तापले आहे. यात भाजप आणि मनसेकडून शिवसेनेने हिंदुत्व सोडल्याची टीका नेहमी करण्यात येत असते. यालाच प्रत्युत्तर देताना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले आदित्य ठाकरे?
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी 10 जूनला अयोध्येत जाणार असल्याची घोषणा केली आहे. राज्य सरकारने केलेल्या कामांसाठी आणि रामराज्यासाठी, प्रभुरामचंद्राचे दर्शन घेण्यासाठी आपण अयोध्येला जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आम्हाला धर्म, हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही. आमचा धर्म सेवाधर्म आहे.

आमचे हिंदुत्व रघुकुल रित सदा चली आयी, प्राण जाये पर वचन ना जाये असे असल्याचेही आदित्य ठाकरे म्हणाले. महाविकास आघाडी सरकारमधील तिनही घटकपक्षांनी दिलेली वचन आम्ही पूर्ण करणार असा दावाही आदित्य यांनी यावेळी केला आहे. तसेच हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुनही आदित्य ठाकरे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. दरम्यान संपलेल्या विषयावर आणि इतर पक्षावर आम्ही बोलत नाही, असे म्हणत आदित्य ठाकरेंनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर निशाणा साधला.

अयोध्या दौरा राजकारणासाठी नाहीच - आदित्य ठाकरे
जेव्हापासून संघर्ष सुरू आहे, तेव्हापासून शिवसेना अयोध्योत जाते. शिवसेनेचा अयोध्या दौरा राजकारणासाठी नाही असे स्पष्ट करताना त्यांनी मनसेवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. आता संघर्ष संपलेला आहे, त्यामुळे आम्ही आता दर्शन आणि आशीर्वाद घेण्यासाठी अयोध्येला जाणार आहोत असे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे. महाराष्ट्रात रामराज्य यावे यासाठी हा आमचा दौरा असल्याचेही आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...