आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांच्या आत्महत्येला जबाबदार कोण?:विरोधी पक्षनेते अजित पवारांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सवाल

नांदेड16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात गेल्या महिनाभरात 89 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शिंदे सरकार स्थापन करताना शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र अशी घोषणा केली होती. मात्र,गेल्या महिनाभरात 89 हून अधिक शेतकऱ्यांनही आत्महत्या केल्या आहेत. यासाठी कुणावर 302 दाखल कराचा असा प्रश्न विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना नांदेडच्या माहूरमध्ये पीक नुकसानीची पाहणी करताना विचारला आहे.

अजित पवार म्हणाले की, सध्या जगाचा पोशिंदा अडचणीत आहे. त्याला अडचणीतून बाहेर काढल्याशिवाय आत्महत्या कशा रोखणार असा सवालही पवार यांनी उपस्थित केला आहे. शेतकरी, कष्टकरी यांच्या समस्या सोडविण्यासाठी हे सरकार कटिबद्ध असेल अशी घोषणा एकनाथ शिंदेंनी सरकार स्थापनेच्या वेळी केली होती. मात्र, केवळ घोषणा करुन उपयोग नाही तर प्रत्यक्षात योजनांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.असेही विरोधी पक्षनेते अजित पवारांनी म्हटले आहे.

मुंबईत राहुन शेतकऱ्सयांचे प्रश्न सुटत नसतात, त्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर जावे लागते असस टोलाही पवारांनी लगावला आहे.गेल्या आठवड्यात नांदेडमध्ये अतिवृष्ठी झाली होती. यावेळी नांदेड जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला होता, याचे पंचनामे झाले नाही याचा दाखला देत अजित पवारांनी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकूण घेत त्यांना मदतीचा हात दिला पाहिजे असेही सांगितले. विदर्भातील शेतकऱ्यांच्या बांधावर जात अजित पवारांनी पाहणी केली होती. यानंतर नांदेडमध्ये शेतकऱ्यांच्या पीकांची झालेले नुकसान पाहणी अजित पवारांनी केली आहे. मराठवाड्यात पावसाचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. त्यांचे सोयाबिनचे नुकसान झाले आहे. असे असताना सरकार हारतुरे आणि सत्कार समारंभात व्यस्त आहे. ज्यावेळी जगाच्या पोशिंदा असलेल्या बळीराज्याला आर्थिक मदतीची गरज आहे असे मतही अजित पवारांनी व्यक्त केले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार

मराठवाड्यातील पूरपरिस्थिती पाहणी दौऱ्याला माहूरपासून सुरुवात केली आहे. सोबत धनंजय मुंडे, प्रदीप नाईक आहेत. सगळ्यांचे एकच म्हणणे आहे, अजून पंचनामे झाले नाहीत. तसेच ज्या देवस्थानच्या शेतकऱ्यांनी जमिनी कसण्यासाठी घेतल्या आहेत, त्यांना पैसे मिळत नाही. ते देवस्थानला जातात. त्यातही पाच हेक्टरच्या पुढे पैसे दिले जात नाहीत, असे वेगवेगळे प्रकारचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. दुपारी जिल्हाधिकारी यांना भेटणार आहोत, आता दिलेल्या निवेदनावर त्यांच्याशी चर्चा करणार आहोत, विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

बातम्या आणखी आहेत...